उन्हाळ्यात संत्री खान्याचे काय फायदे आहेत! माहित आहे का?
उन्हाळ्यामध्ये संत्री खाल्याने शरीर हायड्रेटड राहते

द फ्रेम न्यूज
उन्हाळ्याची चाहूल लागत आहे तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता बाजारात ठीक ठिकाणी फळांच्या स्टॉलवर आपल्याला संत्री पाहायला मिळत आहेत. पण संत्री आपल्या आरोग्या करिता किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहित आहे का?
उन्हाळ्यामध्ये संत्री खाल्याने शरीर हायड्रेटड राहते. तसेच संत्र्यामध्ये विटामिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच संत्रा मध्ये भरपूर प्रमाणात लोह विटामिन सी असते.
अँटिऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक असतात जे पेशींचे पुनरुत्पादन करू शकतात आणि तुम्हाला सर्दी आणि फ्लूचा प्रतिकार करण्यास मदत करतात.
संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे आतड्याचे आरोग्य राखण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी चांगले असते. तसेच शरीरातील विषाणू आणि जंतू पासून संरक्षण करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
तसेच त्वचा कोरडी आणि निर्जीव होत असेल तर संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स आणि विटामिन सी त्वचेला आद्रता देतात त्यामुळे सुरकुत्या कमी होऊन त्वचेवर चमक येते संत्र्याचा रस त्वचेसाठी नैसर्गिक मोशीराईजर म्हणून काम करतो.
संत्र्याची नियमित सेवन केल्याने त्वचेशी संबंधित आजार दूर राहण्यास मदत होते.संत्रां कमी कॅलरी असलेले फळ आहे. वजन कमी करण्यासाठी संत्रे खाणे खरेदी उपयोगी पडते.
यामध्ये असलेल्या फायबर मुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या देखील कमी होते. असे अनेक फायदे संत्रे खाल्ल्याचे आहे त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी संत्रे खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.