जसप्रीत बुमराहन ‘पॉली उमरीगर’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. जसप्रीत बुमरा ने भारतासाठी अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजी करत भारतासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. मग तो कसोटी क्रिकेट, एक दिवसीय क्रिकेट किंवा T20 क्रिकेट या सर्वच फॉरमॅटमध्ये बुमराणे अनेक चमत्कार करून दाखवले आहेत. म्हणून आज भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) मंडळाकडून जसप्रीत बुमराला ‘पॉली उमरीकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
२०२३-२४या वर्षासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. तसेच आयसीसी चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू २०२४ चा पुरस्कारही जसप्रीत बुमराला मिळाला आहे.
त्याने भारतीय संघाकरिता कसोटी २०५ विकेट्स घेतल्या आहेत एक दिवस क्रिकेटमध्ये त्याने १४९ विकेट घेतले आहेत तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ८९ विकेट घेतलेल्या आहेत.
पॉली उमरीगर पुरस्कार बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. या बक्षिसाची रोख रक्कम पंधरा लाख रुपये इतकी आहे.