बिग बॉस १८ च्या फिनाले पूर्वी स्पर्धकांवर प्रश्नांचा भडीमार
ऑक्टोबर मध्ये सुरू झालेला हा शो आता शेवटच्या टप्प्यात आला आहे


Bigg Boss १८ : फिनाले पूर्वी स्पर्धकांवर प्रश्नांचा भडीमार; फायनल मध्ये कोण विजयी होणार याची उत्सुकता .कलर्स टीव्ही वरील सर्वात पहिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस १८सुरू झाल्यापासून चर्चेत आहे प्रत्येक दिवशी नवीन नवीन या शोमध्ये काहीतरी नवीन घडत असतं. तसेच बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले पुढील आठवड्यात आहे बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य बिग बॉस ची ट्रॉफी जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत अशातच आगामी भागाचा प्रमुख सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकार हे घरांमध्ये एन्ट्री करणार असून ते स्पर्धकांना प्रश्न विचारत आहेत.सध्या ‘बिग बाॅस’च्या घरात रजत दलाल,कर्मवीर मेहरा,चूम दारंग,इशा सिंग, अविनाश मिश्रा,विवियन डीसेना आणि शिल्पा शिरोडकर हे स्पर्धक आहेत या सात स्पर्धकांना पत्रकारांच्या तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावे लागली. सर्वात पहिल्यांदा विवियन डीसेनावर प्रश्नांचा मारा झाला बिग बॉसच्या घरात स्पर्धांकांचा प्रवास राहिला आहे त्या आधारे पत्रकारांना स्पर्धकांना त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली आहे.यावेळी डिसेनाला प्रश्न केला की ” तू शोमध्ये आला होता तेव्हा शोमध्ये खूप मोठा धमाका करणार असं सर्वांना वाटले होते.परंतु ते तसे झाले नाही तुला वाटत नाही. का तू अशा प्रकारे शो जिंकू शकतोस? ” यावर विवियन म्हणाला, “मला जे बरोबर वाटले ते मी केले”.त्यानंतर पत्रकारांनी मोर्चा चूम दारंग कडे वळवला पत्रकाराने चूमला विचारलं “सर्वांना असं वाटतं की जर कर्मवीर मेहरा तुझ्यासोबत नसता तर तू आज इथे बसली नसतीस” हे एकूण चुम आणि करणवीर मेहरा दोघेही स्तब्ध होऊन एकमेकांकडे बघत राहिले. त्यानंतर एका पत्रकाराने ईशा सिंगला म्हटलं “तू नेहमीच तुझे कपडे आणि मरण राहते पण तुझे विचार हे खूप जुन्या काळातले आणि खूप खालच्या स्तराचे विचार आहेत”असे अनेक प्रश्नांच्या फैरी स्पर्धकांवर झाडल्या. बिग बॉस १८ चार फिनेलेसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे येत्या १९ जानेवारी रोजी बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉसच्या चाहत्यांच्या नुसार करणवीर मेहरा विवेन दिसेना आणि अविनाश मिश्रा रजत दलाल आणि चुम दरांग हे पाच अंतिम स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकणार आहेत. चाहत्यांच्या मते करण मेहरा आणि विवियन हया दोघांमध्ये ट्रॉफीसाठी अंतिम लढत रंगू शकते प्रेषक शोच्या विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत या सिझनचा विजेता कोण असेल याचीही उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढत आहे. बिग बॉसच्या त्यांच्या मते हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत असणार आहेत.बिग बॉस १८ घ्या लोकप्रिय स्पर्धकांची यादी
१) रजत दलाल
२) करनवीर मेहरा
३) विवियन डीसेना
४) चूम दारंग
५) अविनाश मिश्रा