राज्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरू..!
जिल्ह्यातील १६१ केंद्रावर ४१ पथके तैनात करण्यात आली आहेत.

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तर्फे घेतली जाणारी. HSC (हायर स्कुल सर्टिफिकेट) मंडळाच्या बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे.१८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. छत्रपती संभाजीनगर विभागात ४६० केंद्रांवर ही परीक्षा होत असून, एक हजार ४०८ महाविद्यालयातल्या १ लाख ८५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेत होणारा कॉपी प्रकारावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील १६१ केंद्रावर ४१ पथके तैनात करण्यात आली आहेत.परीक्षा केंद्रावरील संपूर्ण परीक्षेचे व्हिडिओ चित्रण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.पुणे, मुंबई,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, व कोकण राज्यातील या नऊ विभागीय मंडळातर्फे परीक्षा होत आहे.