ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय

एशियन कल्चर' पुरस्काराने जावेदअख्तर सन्मानित

चित्रपटांमध्ये गीत-संगीताला जर महत्त्व दिल्‍यास आपला चित्रपट हा जागतिक दृष्टया नक्कीच नावाजला जाईल," - गीतकार जावेद अख्तर

मुंबई : आशियाई चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांचा गौरव’ एशियन कल्चर ‘ विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल एशियन कल्चर या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्या नंतर आपल्या भावना व्यक्त करताना लेखक आणि गीतकार जावेद अख्तर म्हणाले की  ” चित्रपट जगतात लेखकांना त्यांचा योग्य तो मान व दाम मिळणे गरजेचे आहे. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण असून त्याला योग्य तो वाव देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवे, असे मत त्यांनी मांडले. आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. असं असताना हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली जाते. आपल्याकडे चित्रपटांमध्ये गीत-संगीताला जर महत्त्व दिल्‍यास आपला चित्रपट हा जागतिक दृष्टया नक्कीच नावाजला जाईल,”  असे मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button