छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र
Trending
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवजयंतीच्या निमित्ताने शाहीर साईनाथ इंगळे यांचा पोवाडा सादर
शिवजयंतीच्या निमित्ताने दोन दिवस कार्यक्रम होणार आहेत.

छत्रपतीसंभाजीनगर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते आज करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळी उभारण्यात आलेल्या मंडपात शिवजयंतीच्या निमित्ताने दोन दिवस कार्यक्रम होणार आहेत.
पहिल्या दिवशी साईनाथ इंगळे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम घेण्यात आला. शाहीर साईनाथ इंगळे आसईकर यांनी शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमा वेळी प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.कैलास अंभुरे, वित्त व लेखाधिकारी सविता जम्पावाड,समिती सदस्य डॉ.कैलास पाथ्रीकर, डॉ. संजय कवडे, डॉ. कैलास इंगळे उपस्थित होते.