४५ वे विभागीय वार्षिक पुष्प प्रदर्शनास नागरिकांचा उदंड प्रतिसाद ..!

फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने ४५ वे पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन दोन दिवसाचे आयोजित केले होते. या प्रदर्शनास छत्रपती संभाजी नगर येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामध्ये पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली होती. या प्रदर्शनामध्ये लहान मुलांपासून तर वृद्ध वयोगटातील सर्वच नागरिकांनी या दोन दिवसीय पुष्पप्रदर्शनास हजेरी लावली होती. या प्रदर्शनामध्ये अनेक रंगीबेरंगी फुलं झाड त्यांचे प्रकार विदेशी फुलांची झाड सुद्धा पाहायला मिळत होती.
तसेच गुलाबांच्या १३ प्रजाती असून सुमारे २४७ गुलाबाचे प्रकार येथे उपलब्ध होते यात हायब्रीड लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, पांढरा, निळसर, तसेच दोन रंगाचे,तीन रंगाचे गुलाब तसेच मिनीचर गुलाब पॉलिहाऊस व ग्रीन हाऊस मधील डच रोज बघायला मिळाले. फ्लॉक्स पिंक डायथंन्स, ऍस्टर मेरी गोल्ड, फ्रेंच, आफ्रिकन, तसेच भारतीय प्रजातीची असंख्य फुले जवळून पहायला मिळाले. तर या पुष्प प्रदर्शनाच्या माध्यमातून स्पर्धा सुध्दा घेतली जाते.

असे आयोजक एस टी काळे ( ऑर्गनायझर ) यांनी द फ्रेम न्यूज ला माहिती दिली. ते असे म्हणाले की ” आम्ही गेली ४५ वर्ष दोन दिवसीय पुष्प प्रदर्शन भरवत असतो. उपवने व उद्याने विभाग या विभागातर्फे छत्रपती संभाजी नगर आयोजित करण्यात आलेला आहे. “त्याचा उद्देश असा आहे की छत्रपती संभाजी नगर मधील आपली जी जनता आहे त्यांना या झाडां विषयी माहिती होणे त्याविषयी आवड निर्माण होणे. आणि एकदा आवड निर्माण झाली. ज्या ठिकाणी घर झालं त्या ठिकाणी झाड आली फुल आली रोपटी आली वृक्षआले कुणी सुंदर फुलांची रोपटी लावायची शोभविवंत झाडे लावायची हा उद्देश या कार्यालयाचा आहे. गेली ४५ वर्ष या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करत आहोत. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे ६७ गट आहेत अनेक प्रकारचे फुलं विविध प्रकारची झाडे फळांची झाड आणि कलात्मक पुष्परचना पुष्प रांगोळी अशी विविध प्रकारची प्रदर्शनात भरवण्यात आले आहे आजच्या प्रदर्शनामध्ये ७९ स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. तसेच ८९० प्रवेशक आलेले आहेत.”

सुनील जगदाळे इंन्डूरंन्स कंपनी (ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट) यांनीही या प्रदर्शना विषयी थोडक्यात माहिती दिली. ते म्हणाले की हे गेली ४५ वर्ष पुष्प प्रदर्शन भरतं त्यामध्ये मी गेली ३५ वर्ष वैयक्तिकरित्या यामध्ये भाग घेत असतो आणि इंन्डूरंन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही गेल्या २२ वर्षापासून या पुष्प प्रदर्शनास सहभागी होत असते. आणि सलग बावीस वर्ष ह्या कंपनीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. इंन्डूरंन्स कंपनीने आतापर्यंत चाळीस ट्रॉफी मिळविल्या आहेत. हे पुस्तक प्रदर्शन खरोखरच बघण्यासारखा आहे या प्रदर्शनात वाळूज किंवा शेंद्रा येथील कंपन्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं मला वैयक्तिक वाटतं व लोकांनी जास्तीत जास्त दरवर्षी सहभागी व्हावं आणि पुष्प प्रदर्शनास भेट द्यावे असे ते म्हणाले.”