ममता कुलकर्णी;'ममता नंदगिरी' या नावाने ओळखली जाणार

द फ्रेम न्यूज

९० च्या दशकात चित्रपटातून भूमिका केलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने महाकुंभ मेळ्यात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून दीक्षा घेतली आहे.क्रांतिवीर करण अर्जुन सबसे बडा खिलाडी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून भूमिका केलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी शुक्रवारी गंगा नदीत पिंडदान केले त्यानंतर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिली.
बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता संन्यासी बनली आहे ती आता महामंडलेश्वर म्हणून ओळखली जाईल २५ वर्षानंतर ममता कुलकर्णी भारतात महाकुंभासाठी आली होती. प्रयागराज मध्ये १४४ वर्षानंतर आलेल्या महाकुंभारती भगव्या वेश धारण करून, कपाळावर चंदनाचा गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर झोळी होती. ती किन्नर आखाड्यात पोहोचली आणि तिने आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेतली.
प्रयागराज मध्ये आचार्य महामंडलेश्वर यांची भेट घेतल्यानंतर असे सांगितले की ममता कुलकर्णी तिच्या सानिध्यात महामंडळेश्वर बनेल. २४ जानेवारी २०२५ ला संध्याकाळी हा प्रक्रिया पूर्ण झाली. ती संगमातील संतांबरोबर स्नान करून तिने पिंडदान केले आणि नंतर महामंडलेश्वर ही उपाधी स्वीकारली.
महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णी ‘ममता नंदगिरी ‘ या नावाने ओळखले जाईल ती म्हणाली की ” तिचा जन्मदेवासाठी झाला आहे आणि ती यापुढे पुन्हा कधीही अभिनय क्षेत्रात दिसणार नाही.” असे ममता कुलकर्णी हिने म्हटले आहे.