पालकमंत्री संजय शिरसाट यांचा आज भव्य नागरी सत्कार
विनोद साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजी नगर | दि.२५ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा भव्य नागरी सत्कार आज बुधवार (दि.२६) सायंकाळी ७ वाजता, जुना भावसिंगपुरा शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख विनोद साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भावसिंगपुरा शिवसेना शाखेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
यावेळी महाराष्ट्राच्या महागायिका पंचशीला भालेराव स्वरगंगा गीत संगीताचा कार्यक्रम होईल.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युगंधर सेवा प्रतिष्टानच्या अध्यक्षा हर्षदा शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, उद्योजक रखमाजी जाधव, उपशहर प्रमुख अजय काळे, पडेगाव शाखाप्रमुख राहुल यलदी, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाराणी वाडकर, उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के, सुरेश वर्मा, विजय चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा संघटक एन.ए. अजहर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन लिला सुखदेव अंभोरे हे करतील. या जाहीर सत्कार सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शाखाप्रमुख शिवहरी वाघमारे, विभागप्रमुख भरत साबळे, गटप्रमुख नितीन वाघुले, योगेश लोखंडे, शरद साबळे, नितीन साळवे, विक्की साबळे, वैभव लोखंडे, धर्मेंद्र साबळे, अविनाश घुले, प्रशांत साबळे, यश साबळे, अविनाश वाघमारे तसेच समस्त शिवसेना शाखा भावसिंग पुरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी नगरसेविका रुख्मिणीबाई लोखंडे यांचा शिवसेनेत प्रवेश.. पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका रुख्मिणीबाई लोखंडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात होणार आहे. त्यांच्याबरोबर दादासाहेब लोखंडे, शिवाजी लोखंडे, मुरलीधर लोखंडे, व परमेश्वर लोखंडे यांचाही यावेळी जाहीर प्रवेश होणार आहे.