सिडकोचे घर एका कुटुंबातील दोघांना खरेदी करता येईल
जाचक अटी सुद्धा शिथिल करण्याचे आदेश सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी दिले आहेत.


सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्याचे आदेश सिडकोचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेले आहेत. एकाच कुटुंबात दोघांना सिडकोचे घर खरेदी करता आलं पाहिजे. सर्वसामान्यांना परवडणारी घर मिळावीत. आणि मराठी माणसाला हक्काचे घर मिळावं तो शहराबाहेर फेकला जाऊ नये त्याच्या खिशाला परवडेल अशा किमतीत त्याला घर मिळावे याकरिता सिडकोच्या जाचक अटी सुद्धा शिथिल करण्याचे आदेश सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी दिले आहेत. तसेच एकाच कुटुंबात दोघांना घर खरेदी करता आलं पाहिजे काय म्हणाले सिडकोचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट पहा. “सिडकोची २६ घरांची स्कीम मी आता काढलेली आहे काढलेली त्याच्यामुळे त्याच्यात अनेक ठिकाणी कमी सुद्धा किमती आहेत थोडं जास्त असेल आता एका वेग वेगळ्या ठिकाणी कमी सुद्धा किमतीत थोडा जास्त असेल लोकेशन पाहून ठरवलेल्या किमती आहेत. हे खारघरच्या ठिकाणी पाहतात किमती अप्पर साइडला आहेत. ते लोकेशन वाईज दिलेलं आहे. तिथे असणाऱ्या जमिनीचं नरिमन पॉईंट चा रेट वेगळा आणि खारघर चा रेट वेगळा असं हे अंतर आहे. म्हणून त्याचा रेट आपल्याला जास्त वाटतो. परंतु माझं वयक्तिक असं मत आहे की काही ठिकाणी किमती थोड्या बहुत कमी झाल्या पाहिजे. ठीक आहे थोडा सिडको चा लॉस होईल. होतो याची मला जाणीव आहे परंतु सर्वसामान्य माणसांना वन बीएचके घ्यायचं आहे त्याला किमतीत घर परवडला पाहिजे.सिडकोच्या अटी सुद्धा शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत. “कारण अटी भरपूर आहेत,” मी एक वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे.” ज्याचं एक घर आहे त्याला दुसरं घर घेता येत नाही”, “ही अट आपल्यासाठी कशासाठी असली पाहिजे, कुटुंबाचा विस्तार होत असतो म्हणजे एखाद्या कुटुंबात जर वडिलांनी घर घेतलं तर मुलाला घर घेता येत नाही. ह्या जुन्या अटी आता शिथिल झाल्या पाहिजे. कारण कुटुंबाचं विभाजन होतं विस्तार होतो त्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घर खरेदी करता आला पाहिजे.” या सर्व जाचक अटींचा अभ्यास करून जेवढ्या अटी शिथिल करता येतील तेवढ्या मी करणार आहे कारण सर्वसामान्य लोकांना घर खरेदी करता आलं पाहिजे” असं सिडको चे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.