‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण


मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ‘ अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण नव्या भारतीय साक्ष कायद्याच्या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहनांचं लोकार्पण करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते म्हणाले…‘‘महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. की ज्या राज्याने त्याला अनुकुल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनस तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्याठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये एक सायंटिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेनिक एक्सपर्टचा दर्जा आहे ज्यांचे सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे. आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही इव्हीडन्स आहे, तो इव्हीडन्स ते जमा करतील, त्यामुळे अतिशय सबळ आणि साईंटीक पुरावा हा आपल्याकडे याठिकाणी राहील.’’
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(महाराष्ट्र राज्य)