जागतिक महिला दिनानिमित्त राज्य पत्रकार संघाच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा होणार सन्मान
: 'जागतिक महिला' दिनाच्या निमित्ताने समाजातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणार आहे

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : ‘जागतिक महिला’ दिनाच्या निमित्ताने समाजातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर च्या वतीने करण्यात येणार असून शनी मंदिराजवळील आयएमए हॉल येथे शनिवारी (दि.८) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष छबुराव ताके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण, युगंधर प्रतिष्टानच्या अध्यक्षा हर्षदा संजय शिरसाट, आयएएम च्या अध्यक्षा डॉ.उज्वला दहिफळे, पत्रकार आरती श्यामल जोशी, यांची उपस्थिती राहील. या सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत तर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन लिला सुखदेव अंभोरे हे करतील.
या सन्मान सोहळ्यास पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष उमेश जोशी, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संताराम मगर, विलास शिंगी, ज्ञानेश्वर खंदारे, महेंद्र डेंगळे, प्रशांत सूर्यतळे सुजित ताजने, श्री पाटणी, यांनी केले आहे
यांचा होणार सन्मान…!
तेजश्री दिलीप पाचपुते, निर्मला निंभोरे, प्रविणा ताराचंद यादव, लता जाधव, डॉ. अर्चना चंद्रकांत गणवीर, स्मिता प्रल्हाद जोंधळे, निता गंगावणे, सरला राजेश सदावर्ते, भाग्यश्री अण्णासाहेब जगताप, विद्या गावंडे, दिव्या रमेश इंगळे, डॉ. सुषमा उन्मेष शिंदे, पृथा वीर, जयश्री एस. भगत, उज्ज्वला सुभाष साळुंखे, योगेश्वरी बाबुलाल बोहरे, डॉ. वर्षाराणी इंदानी-खोचे, अनु गंगाराम चव्हाण, कविता वाघ घुगे, पूजा वानखेडे, योगिता कृष्णा शिंदे, मनिषा वाघमारे, अनिता ज्ञानदेव फसाटे, सविता रत्नाकर कुलकर्णी,कल्पना इंद्रसिंग राजपूत, प्रा. भारती भांडेकर