छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्रराजकीय
Trending
'प्राधिकरणाने औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे यांना जोडणारे प्रशस्त रस्ते तयार करावे' - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे निर्देश देतांना म्हणाले आहेत की,” छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शहराजवळील औद्योगिक क्षेत्र व पर्यटन क्षेत्रांचा विचार करावा. त्यानुसार आपली विकास योजना तयार करावी.

प्राधिकरणाने शहराजवळील असलेले औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे यांना जोडणारे प्रशस्त रस्ते तयार करावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदींसह अधिकारी उपस्थित होते.