छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending
पोस्टाचा या उपक्रमाचा मुंबईतील तिकीट प्रदर्शनात सहभाग होणार आहे


छत्रपती संभाजीनगर : भारतीय पोस्टाच्या माध्यमातून आता ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आहे. त्याच शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५२ दरवाजा पैकी १८ दरवाजे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली पानचक्की हिचा सुद्धा भारतीय पोस्ट कार्डवर समावेश करण्यात आलेला आहे.टपाल खात्याचे ई-बुक प्रदर्शित होणार असून त्यात शहराची ऐतिहासिक आणि पाण्याचक्की ची माहिती दर्शविली जाईल. यामुळे प्रदर्शनात शहराचा गौरवहोईल पोस्टाने पंतप्रधानांना पाठविलेल्या राख्या आणि संदेशाचा ही त्यात समाविष्ट राहणार आहे.आपल्या शहरातील सचित्र पोस्ट कार्ड ग्राहकांना विकत घेता येणार आहे कर्मचारी व कुटुंबाचा गुणगौरवही केला जाणार आहे. ई- बाइक वाटप होणार असून पुढील कामकाज सुरू आहे.असे पोस्टमास्तर जनरल अदनान अहमद यांनी म्हटले आहे.