'छावा'चा जबरदस्त ट्रेलर;अंगावर येईल काटा,दोन तासांत मिळाले १५ लाख व्ह्यूज!
विकी कौशल धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तिशाली भूमिकेत दिसत आहे

फ्रेम न्युज
बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहत होते. या ट्रेलरमध्ये विकी कौशल धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तिशाली भूमिकेत दिसत आहे.
मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर तीन मिनिटे आणि आठ सेकंदांचा आहे. या ट्रेलरला दोन तासांत १५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या ट्रेलरनंतर आता चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
तसेच या चित्रपटातील गाणीही जबदस्त आहेत.ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली विकीची दमदार शैलीट्रेलरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक दमदार संवाद ऐकू येत आहेत. एका दृश्यात, विकी कौशल शत्रूच्या छातीवर पाय ठेवून म्हणतो, “आम्ही आवाज करत नाही, आम्ही थेट शिकार करतो.” ट्रेलरमध्ये रश्मिका मंदान्ना देखील दिसत आहे.
या चित्रपटात तिने संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विकी, रश्मिका आणि अक्षय खन्ना व्यतिरिक्त आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता आणि डायना पेंटी सारखे कलाकारही दिसत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आणि त्याला त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चला तर मग येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ ,चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा