आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून कालावधी पर्यंत निलंबन

मुंबई:औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. अबू आजमी यांनी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमाची बोलताना ‘औरंगजेब किती चांगला शासक होता’ असे वक्तव्य केले होते. विधानसभेत काल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला याबाबतचा प्रस्ताव सभागृहाने संमत केला. काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईला पाठिंबा दिला. अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न विरोधकांनी सरकारला उपस्थित केला.आमदार आदित्य ठाकरे यांनीही अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईचं समर्थन करत, अशाच प्रकरणात इतरांवरही कारवाईची मागणी केली.
“औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकत नाही तो नालायक होता मुस्लिम लोकांमध्येही कोणी मुलांचे नावे औरंगजेब ठेवत नाहीत” – विजय वडेट्टीवार काँग्रेस गटनेते