चक्क I LOVE YOU म्हणत; बिग बॉस'च्या मंचावर सलमान खानला घातली लग्नाची मागणी
लग्न करण्याची मलाही इच्छा आहे. सर, तुम्हीच करा माझ्याशी लग्न…'

द फ्रेम न्यूज

‘बिग बॉस’ च्या १८ चं पर्व संपले आहे. रविवार १९ जानेवारी रोजी बिग बॉसच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला.करणवीर मेहराने या पर्वावर आपलं नाव कोरलं आहे. पण, सध्या ग्रँड फिनालेमध्ये घडलेल्या एका खास गोष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे.
बिग बॉस १८ च्या पर्वात सहभागी झालेल्या चाहत पांडेने चक्क सलमान खानला लग्नासाठी मागणी घातली हे पाहून स्वतः सलमान खान हैराण झाला. यापूर्वी सुद्धा सीझन सुरू असताना चाहतने याबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र, ग्रँड फिनाले लाइव्ह सुरू असताना चाहतने पुन्हा एकदा जाहीररित्या सलमानला लग्नासाठी विचारलं.
त्याच असं झालं की,सलमान खानने शोच्या महाअंतिम सोहळ्यात चाहत पांडेला मजेशीर अंदाजात विचारले की ” चाहत शोमधून बाहेर पडल्यावर, ‘पहिला फोन कोणाला केला आईला की अजून कोणाला…?’ यावर चाहत पांडेन म्हटलं की आईला फोन केल्याचं सलमान खानला सांगितलं. पुढे, चाहतची फिरकी घेत सलमान खान म्हणाला, ‘आई आणि बॉयफ्रेंडला कॉन्फरन्सवर घेऊन फोनवर बोलली असतीस तर किती छान झालं असतं.’
चाहत म्हणाली, ‘सर, असं नका बोलू हे सगळं खोटं आहे. लग्न करण्याची मलाही इच्छा आहे. सर, तुम्हीच करा माझ्याशी लग्न…’ चाहतच्या प्रश्नावर सलमान लगेच म्हणाला, ‘यासाठी ( लग्नासाठी ) रजत आहे ना…त्याच्यात काय वाईट आहे’ मात्र, यावेळी रजत आणि चाहतने, असं काहीच नसून… आम्हा दोघांची नावं एकमेकांशी जोडू नकात असं स्पष्ट केलं आहे.
चाहतने घातलेल्या लग्नाच्या मागणीबद्दल सलमान म्हणाला, ‘तुझी आईच तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधेल. तू तुझ्या आईशीच बोलू घे…’ यानंतर चाहत सलमानला I Love You सुद्धा म्हणाली. हे सर्व बिग बॉस पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यातील मंचावर घडले उपस्थित असलेल्या सर्वच आश्चर्यचकीत झाले.