कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये "सृजन" अत्याधुनिक मातृ व बाल विभागाचे थाटात उद्घाटन
रुग्णालयाचे आणखी एक पाऊल माता व बाल सुरक्षेच्या दिशेने..!

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजी नगर २२/०५/२०२५
मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत असलेले कमलनयन बजाज रुग्णालयात आज सृजन या नव्या मातृ व बाल आरोग्य विभागाचा भव्य शुभारंभ झाला.या उद्घाटन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून ट्रस्ट श्री नंदकिशोर जी कागलीवाल उपस्थित होते. त्यांच्यासोबत ब्रिगेडियर वीरेंद्र सिंह व कर्नल शरद भल्ला हे मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. सजन ही सुविधा मातांना व बालकांना परिपूर्ण आधुनिक व उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे येथे कायमस्वरूपी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवधर डॉक्टर वेदयात्री देशमुख डॉक्टर अमृता थेटे तसेच बालरोग तज्ञ डॉक्टर निखिल पाठक डॉक्टर अभिजीत जोशी डॉक्टर आशिष थेटे हे आधुनिक नवजात शिशु देखभाल (NICU), तसेच अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध आहे याप्रसंगी हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की “सुजन” “ही सुविधा त्यांच्या दर्जेदार व प्रेमळ सेवांचा विस्तार असून कमलनयन बजाज हॉस्पिटल हे मातृ व बाल आरोग्य सेवे त उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून नावारूपास येईल.” “तसेच ही सुविधा केवळ इमारती पुरती मर्यादित नाही तर विश्वास सुरक्षितता आणि प्रत्येक कुटुंबासाठी आशा निर्माण करण्यासाठी आहे” असे रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
