छत्रपती संभाजीनगरतंत्रज्ञानताज्या बातम्यामहायुतीमहाराष्ट्र
Trending
पोलिस खात्यात अत्याधुनिक ३३ नव्या वाहनांची खरेदी; पालकमंत्री यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

छत्रपतीसंभाजीनगर -जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पोलिसांना अत्याधुनिक साधन-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५ कोटी रुपयांच्या निधीतून ३३ नव्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. “अत्याधुनिक सुविधा, साधने उपलब्ध करून पोलीस दल अधिक सक्षम व बळकट करण्यावर शासनाचा भर” – संजय शिरसाट (पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर)