कॉमेडियन कुणाल कामराचा शिवसेनेतर्फे जोडे मारून निषेध

कॉमेडियन कुणाल कामराचा शिवसेनेतर्फे जोडे मारून निषेध
पैठण | दि. २४ :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे तयार करून त्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ पैठण तालुका, शहर शिवसेनेच्या वतीने आमदार विलास संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनात कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी करून कुणाल कामरा याच्याविरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी तुषार पाटील, सोमनाथ परदेशी, किशोर चौधरी, शिवराज पारिख, नामदेव खरात, राजु मापारी, बाळासाहेब माने, सोमनाथ परळकर, जालिंदर आडसुळ, अजित पगारे, संजय कस्तुरे, सुनील हिंगे, मनोज गायके जनार्दन मिटकर, आबासाहेब गिरगे, भारत कासोदे, ऋषी दहिभाते, अमित गोरे, किरण घाटविसावे, विलास मोरे, मनिष ओटे, अमोल गिरगे, अक्रूर गलधर, विष्णू जगताप, योगराज बुंदिले, पदम खंदारे, विष्णू खंडागळे, विकी खांडेकर, अक्षय सपकाळ, भरत बोडके, महेश बोडके, रामा चौके, अविनाश चौके, आदि शिवसैनिकांनी मागणी करत जाहीर निषेध व्यक्त केला.