'छावा' चित्रपटाच्या टीझरला शिवप्रेमींचा विरोध..!
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना या चित्रपटामध्ये डान्स करताना दाखवल्यामुळे शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे

द फ्रेम न्यूज

पुणे : ‘छावा’ चित्रपटाच्या टीझरला शिवप्रेमींचा विरोध ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा टीचर प्रदशिर्त झाल्या झाल्या काही तासातच लाखो व्ह्यूज या टीचरला मिळाले. टिझर एकदम दमदार आहे . चित्रपटाची स्टार कास्ट सुद्धा डायलॉग, ॲक्शन ,दमदार पण आता या टीचरला विरोध दर्शवण्यात आलेला आहे. त्याचा कारण असे की छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना या चित्रपटामध्ये डान्स करताना दाखवल्यामुळे शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.
चित्रपट राज्यात कुठेही सिनेमागृहात प्रदर्शित होऊ देणार नाही. असा कडकडीचा इशारा शिवप्रेमींनी दिलेला आहे. याविषयी छत्रपती संभाजी राजे काय म्हणाले.” लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, यांची संपूर्ण टीम भेटली होती. आणि मुंबई आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हि जी काही क्लिप आहे.ती क्लिप मला दाखवली होती. पण मी त्यांना सांगितलं होतं की, की मला पुर्ण चित्रपट पाहायला द्या बघायला द्या इतिहासकरांना मी तुम्हाला भेट करून देतो जेणेकरून कुठे काय चूक असेल किंवा केव्हा कुठे काय दुरुस्ती असेल ती आपण दुरुस्ती सांगितल तर खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संपूर्ण जगभरात पोहचवू शकतो पण त्यांच्या कडून इतिहासकार मंडळींनी आम्हाला अजून सुद्धा बोलवलं नाही जेने करून आपण त्यांना ग्रिन सिग्नल देऊ”
” एकंदरीत जे तुम्हाला पहायला मिळत ट्रेलर मध्ये संभाजी महाराज हे लेझीम खेळताना किंवा डान्स करताना दिसत आहेत, लेझीम खेळणं ही आपली संस्कृती ठेव आहे, लेझीम खेळणे काही चुकीचं नाही, पण गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करताना हे कितपत योग्य आहे, किंवा नाही याबाबत चर्चा होन महत्त्वाचं आहे. या विषयी सर्व इतिहासकारांनी एकत्र बसणं गरजेचे आहे.पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही.लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती राहील तुम्ही आम्हाला दाखवा आणि त्या मध्ये बदल करावा.”