जागतिक रेडिओ दिनानिमित्त ऐतिहासिक जुन्या रेडिओंचे भव्य प्रदर्शनास डॉ. विनय कुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती
आम्ही जो काळ जगलेला आहे. आजची पिढी जी आहे त्यांना तो काळ जगता येणार नाही

छत्रपती संभाजीनगर : १३ फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन म्हणून ओळखला जातो. छत्रपती संभाजी नगर येथील अमर हाउसिंग सोसायटी सिडको एन – ८ मध्ये श्री संजय पवार यांच्या निवासस्थानी जुन्या रेडिओचा भव्य रेडिओचा प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमास आवर्जून डाॅ. विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक संभाजी नगर यांनीही उपस्थिती दर्शवली होती.

त्यांनीही या प्रदर्शनाचं कौतुक केलं श्री संजय पवार यांचे मन भरून कौतुक केलं ते म्हणाले की “आज विश्व रेडिओ दिना निमित्ताने रेडिओंचे एक्झिबिशन पाहायला मिळाले. की माझं सौभाग्य आहे की जी विरासत आपल्याला एल पी प्लेअर पासून ते पेन ड्राईव्हच्या हि पुढे गेलेली क्लाऊड पर्यंत पुढे गेलेली आहे. आम्ही जो काळ जगलेला आहे. आजची पिढी जी आहे त्यांना तो काळ जगता येणार नाही.आणि बऱ्याचदा आपण व्हाट्सअप आणि रील्स पाहतो पण कॅसेट्स रेकॉर्ड प्लेयर पेन्सिलने रिवाइंड करण्याची जी काय मजा होती आज कालच्या मुलांना ती मजा नाही येणार, इथला एक एक मॉडेल असा आहे जो की माझा ऍक्च्युली आयुष्य मी जगलेलो आहे. नॅशनल पॅनासोनीक चा कॅसेट प्लेअर असो, सॅनिओचा थ्री इन वन प्लेअर असो, काही आधीचा जो एंपियर मीटर असलेला मोठा रेडिओ असो ज्याला पाच मिनिटं लागत असे चालू व्हायला विशेष म्हणजे हे सर्व वर्किंग कंडिशन मध्ये आहेत मला वाटतं अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि हे आणि फक्त एक पॅशिनेट माणूसच करू शकतो. आणि मी पुन्हा एकदा अभिनंद करतो आणि आपण सर्वांचेंही कर्तव्य आहे की आजच्या दिवशी हा जो त्यांनी छंद आहे जोपासलेला आहे त्याला आपण सर्वांनी आजच्या दिवशी तरी जास्तीत जास्त लोकांनी पाहणे गरजेचे आहे. आणि खरंच ही मेहनत आणि हे काम सोपं नाहीये मोबाईल आणि पेन ड्राईव्हच्या काळात फोन नंबर सुद्धा लक्षात राहत नाही आपल्याला एक क्लास येईल की आपल्या मित्रांचे सुद्धा नाव लक्षात राहणार नाहीत त्या काळातून तर ह्या काळापर्यंत अगदी छोट्यातल्या छोटा रेकॉर्ड प्लेयर चालू करायचं म्हणजे त्याच्यामध्ये एक आनंद असायचा त्यापासून जे मुकत आहे जगण्यासाठी अशा ठिकाणी आणि असे लोक राहणं गरजेचं आहे मला वाटतं खूप खूप अभिनंदन आणि माझ्या खूप शुभेच्छा धन्यवाद”
डॉ.विनय कुमार राठोड
(पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर)
काही वृद्ध रेडिओ प्रेमी सुद्धा या प्रदर्शनास भेट देण्याकरिता आले होते त्यांनीही आपल्या काळातील रेडिओ संदर्भातील आठवणी जागृत केल्या आणि ते म्हणाले की “मला ह्या प्रदर्शनाबद्दल माहिती मिळाली आणि मी थेट या प्रदर्शनास भेट देण्याकरिता आलो इथला ऐतिहासिक साठा पाहून अत्यंत चांगलं वाटलं रेडिओच्या काळात गेल्यासारखं वाटलं”
त्यानंतर काही महाविद्यालयातील युवा पिढीतील मुलही आले होते ते म्हणाले की “आमची पिढी मोबाईल आणि कम्प्युटरमध्येच बिझी आहे पण हा जो ठेवा संजय पवार सरांनी ठेवलेला आहे याला आवर्जून लोकांनी पाहायला आलं पाहिजे. आम्ही हे सर्व जुने रेडिओ फोटोच्या माध्यमातून पाहिले होते पण आज इथे येऊन ते प्रत्यक्ष पाहिले पाहून फार आनंद वाटला “

काही महिला आल्या होत्या त्यांनीही त्यांच्या बालपणीच्या आठवणी रेडिओ संदर्भातल्या सांगितल्या त्यात त्यांनी महिलांविषयी कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रम याबद्दल त्यांनी माहिती दिली इथे येऊन घरच चांगलं वाटलं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असं म्हटलं आहे.
ज्यांनी हे प्रदर्शन भरवलं होतं त्यांची मुलाखत घेताना ते म्हणाले की आमच्या लहानपणी आवड होती कारण आमच्या लहानपणी रेडिओ शिवाय मनोरंजनाचे दुसरे कोणती साधन नव्हतं रेडिओवर आम्ही सकाळी वरची गाणी ऐकायची नंतर विशेषता ऐकायचं त्यानंतर क्रिकेटची कॉमेंट्री या तीन गोष्टीमुळे व्हिडिओ आजही आमच्या घरामध्ये आहे किचनमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे घरामध्ये आमची महिला पण व्हिडिओ ऐकत स्वयंपाक करत असते.” तसेच लहानपणी गावामध्ये बायोस्कोप तेव्हा मी ते बसून ते बघायचं तर तेव्हा ते फिरवायचं तेव्हा आम्ही तेव्हापासून कुतूहल होतं ग्रामोफोनच जेव्हा एज्युकेशन संपलं माझं आणि नोकरी लागली तेव्हापासून १९८९ पासून हे एक एक साहित्य जमा करायला सुरुवात केली. १९४० पासून चे व्हिडिओ आहेत आपल्याकडे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चे रेडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत. तेच भावी पिढीला हे सांगतो की तुम्ही रेडिओ ऐका आणि महिलांनाही सांगतो की मोबाईलवर धारावी बघण्या येवजी रेडिओ ऐकत स्वयंपाक करत जा आणि मुलांना पण मोबाईल आणि कार्टून बघण्यापेक्षा रेडिओ ऐकत जा कारण रेडिओवर ऋतूप्रमाणे सर्वच कार्यक्रम उपलब्ध असतात.
ह्या कार्यक्रमास रेडिओ प्रेमींनी गर्दी केली होती. प्रदर्शनामध्ये ४२७ प्रकारचे विविध जुनें रेडिओ बघायला मिळतात त्यामध्ये २५ वॉल रेडिओ ४० साधे रेडिओ आणि दोन रेडीओग्राम यांचा समावेश आहे त्याशिवाय संग्रह २०० रेकॉर्ड आहेत अशी माहिती संजय पवार यांनी दिली तसेच संग्रहात सीरियात १९५३ मध्ये तयार केलेला व्याक्युम ट्यूबचा दुर्मिळ मर्फी आणि सिरीयल बनावटीचा मुलार्ड रेडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. या प्रदर्शनात छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक आवर्जून उपस्थित होते त्यांनी या संग्रहाचा लाभ घेतला आणि त्यांनी फ्रेम न्यूज चॅनलला प्रतिक्रिया ही दिल्या.