नागपूरात शिवकालीन वाघनख आणि शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन..!

द फ्रेम न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कविवर्य सुरेश भटसभागृह येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे आणि शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन केले. ते म्हणाले

“हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो.” “आपल्या सर्वांकरिता ही अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण करण्याकरिता जाणार ज्या वाघणखांचा वापर केला होता ती वागणं महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि आणि आमचे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खर्गे यांच्या प्रयत्नांमुळे ही वाघ नखं भारतात आली.”
“मी सांगू इच्छितो मुख्य पर सचिवांना नागपूर एक वेगळे शहर आहे आमच्याकडे आमच्या संग्रहालयाला अजब बंगला म्हणतात त्या अजब बंगल्यामध्ये त्या ठिकाणी आताही वाघ नखं आलेली आहेत, ” छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी हिमतीने आणि कल्पकतेने छत्रपती शिवरायांनी त्याच्यातून मार्ग काढला आणि म्हणून आज जे आपण स्वातंत्र बघत आहे त्या स्वातंत्र्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर छत्रपती शिवरायांनी केलेली आहे.”

“एवढ्या पुरता शिवरायांचं कार्य मर्यादित नाही तर या देशांमध्ये एखाद्या शासकाने कशा प्रकारे राज्य कारभार चालवावा याची वस्तू पाठ हा छत्रपती शिवरायांनी दिला. पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवले पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली पाहिजे हे आपल्याला महाराजांनी शिकवलं, महिलांच्या बाबतीत संवेदनशीलता काय असते हे महाराजांनी शिकवलं”
आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी जे आपल्याला जे देणं दिलेलं आहे खऱ्या अर्थाने त्यामुळेच शिव छत्रपती शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत.
आणि म्हणून त्यांची वाघनखं आज या ठिकाणी आल्यानंतर त्याचा दर्शन घेताना शस्त्र स्वराज्याची शस्त्र आहेत त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी स्वराज्यामध्ये श्वास घेतो आहोत हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्याव लागेल.”
तसे देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट विभागाच देखील मनापासून अभिनंदन केलं ही पोस्ट विभागाने वाघ नखांचा पोस्ट तिकीट काढल आहे. पुढे ते असे म्हणाले की
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने ९ तिकीट आतापर्यंत आपल्या संस्कृती विभागाने पुढाकार घेऊन काढलेली आहेत. त्यामध्ये राजे शहाजी भोसले, राजमाता आई जिजाऊ साहेब, सुवर्ण होणं, छत्रपती संभाजी राजे, भक्ती शक्ती संघ, किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, राजमुद्रा, तानाजी मालुसरे, अशा विविध पोस्ट तिकीटा नंतर आपण आज वाघनखांच देखील तिकीट काढलं आहे.हा सगळा इतिहास आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा इतिहास आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन करतो”
पुढे ते असे म्हणाले की, आणि आपल्या सगळ्या प्रशासनाला विनंती करतो की आपण प्रयत्नपूर्वक विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमची तरुणाई आणि आमचे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतील अशी सोय करावी. या ठिकाणी त्यांना आणून त्यांना आपल्या इतिहासातल्या अनमोल ठेवायचं दर्शन मिळाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो”
असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोस्ट मास्टर जनरल (नागपूर परिक्षेत्र) शोभा मधाळे, मुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.