जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांची साफ सफाई

छत्रपती संभाजीनगर | दि.१५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात आणि महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात शनिवारी (दि.१५) महापुरुषांच्या पुतळ्याची साफ सफाई करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची स्वच्छता करून मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष राजू शिंदे, विजय साळवे, संतोष जेजुरकर, दत्ता गोर्डे, संदेश कवडे, संजय हरणे, शेख रब्बानी, गणेश सुरे, नारायण मते, राजेंद्र दाते पाटील, आनंद तांदूळवाडीकर, बंडू ओक, सचिन खैरे, गोकुळ मलके, सुरेश वाकडे, महेश वाझे, प्रभाकर मते, नागेश फुले, पंकज जोशी, किरण सुरे, अभिजित थोरात, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांच्यासह शिवभक्तांची उपस्थिती होती. महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. पैठण गेट येथील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सावरकर चौक येथे स्वातंत्र्यविर सावरकर, संभाजीपेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, मिल कॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज, लेबर कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, एन-7 तसेच चिकलठाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची स्वच्छता करून मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज आंतर शालेय चित्रकला स्पर्धा १६ फेब्रुवारी, रविवार रोजी सकाळी ८ ते १२ वाजेदरम्यान शहरातील विविध शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धांचे शाळेच्या सोयीनुसार आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, अनिल बोरसे, राजू शिंदे, अभिजित थोरात, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले आहे.