तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपचं उगवलं कमळ..!
दिल्लीच्या जनतेने प्रेम दिलं, विश्वास दाखवला, हे कर्ज दिल्लीच डबल इंजन सरकार चुकवणार " - नरेंद्र मोदी

द फ्रेम न्यूज नेटवर्क
दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीत जनतेने भाजप पक्षाला बहुमत दिलं आहे.दिल्लीत भाजप पक्षाने आम आदमी पक्षाच्या १२ वर्षांच्या सत्तेला खिंडार लावलं आहे. भारतीय जनता पार्टीने तब्बल २७ वर्षांनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. कर ना भारतीय जनता पक्षाने जवळपास ४८ जागांवर विजय मिळवला असून आघाडी वर आहे., आम आदमी पार्टीला केवळ २२ जागा मिळवण्यात यश आलं आहे.
यानुसार दिल्लीत भाजपाची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. आता केवळ निकाल जाहीर होण्याची औपचारिकता बाकी आहे.२०१५ च्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा भाजपला मिळाल्या होत्या. केंद्रात भाजपचा सरकार असूनही भाजपला दिल्ली काबीज करता आलेली नव्हती. पण मग या निवडणुकांमध्ये भाजपने दहा वर्षात पक्षाने उंच भरारी घेत सर्वाधिक जागा दिल्लीत मिळवल्या आहेत. दिल्लीत झालेल्या २०२५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला दारून पराभवाला समोर जावं लागलं आहे.
इतकेच नाही तर आम आदमी पक्षाचे बडे नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरही नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.तर मुख्यमंत्री आतिशी विजयी झाल्या आहेत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात आपच्या पराभवानंतर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. आम आदमी पक्षाच्या प्रभावाची कारणे शोधली जात आहे. राजकीय विश्लेषक यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा करू लागले आहेत. कारण दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने दिल्लीतील जनतेला सुख सुविधा पुरविल्या नंतरही का प्रभावाला समोर जावं लागलं?दिल्लीतील जनतेला आम आदमी पक्षाने शैक्षणिक विकास, मोफत वीज, पाणी, आणि वैद्यकीय सुविधा देणाऱ्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत पराभवाचा फटका का बसला?
दिल्लीतील आपच्या पराभवाला आणि भाजपाच्या विजयाला काही महत्त्वाचे घटक कारणीभूत असल्याचं राजकीय विश्लेषकांच्या मतें असं निष्कर्ष आहे.दिल्ली निवडणुकीत रस्त्यांची दुरावस्तेचा मुद्दा प्रभावी राहिला. एकीकडे अरविंद केजरीवाल मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देत असताना भाजपाने पायाभूत सुविधांचा मुद्दा लावून धरला होता बहुदा त्यामुळेच भाजप मतं मिळवण्यात अग्रेसर ठरली. गेल्या काही वर्षात दिल्लीतील अनेक भागांत पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवली.
यात भाजपने दिल्लीत सुरु असलेल्या फ्री सुविधा सुरू ठेवण्याचं आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे दिल्लीच्या मतदारांनी पाणी आणि रस्त्याच्या मुद्द्यावर भाजपला साध दिली.यंदाच्या निवडणुकीत मुस्लीम मतांचे विभाजन दिसून आले आहे.मुस्लीम मतदारांनी एकत्र राहून आपला मत न देता काँग्रेस आणि एमआयएमला मत दिली. त्याचा थेट फायदा भाजपला झाला.भाजपने ८वा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी भाजपाला मतदान केल्याचं दिसून येतंय. लोकसभेत एकत्र निवडणूक लढविणारे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र एकत्रित लढताना दिसले नाही यावरून भाजपचा विजय झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
विजया नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या भाजप कार्यालयात पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला ते म्हणाले ” आज दिल्लीच्या लोकांमध्ये समाधान आणि उत्साह दिसून येत आहे हा उत्साह विजयाचा आहे आणि समाधान दिल्ली आपदेतून मुक्त झाल्यामुळे आहे.”
“मी दिल्लीकरांना विनंती केली होती की २१ व्या शतकात भाजपला सेवेची संधी द्या दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनविण्यासाठी ही संधी मी मागितली होती.”
” मी दिल्लीच्या जनतेला वंदन करतो कारण त्यांनी मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला मी दिल्लीकरांचे मनापासून आभार मानतो. दिल्लीने मनापासून आमच्यावर प्रेम केलं. मी हा विश्वास देऊ देतो की तुमचं प्रेम विकासाच्या रूपाने तुम्हाला परत देईल. दिल्लीच्या जनतेने प्रेम दिलं, विश्वास दाखवला, हे कर्ज दिल्लीच डबल इंजन सरकार चुकवणार आजचा विजय ऐतिहासिक आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी