कुंभमेळ्यात हार विकणाऱ्या 'मोनालिसाला' मिळाली चित्रपटाची ऑफर
'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी

द फ्रेम न्यूज
प्रयागराज : महाकुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांच्या मोनालिसाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतल याय फूटपाथवर रुद्राक्षाचे मणी विकणाऱ्या मोनालिसाला आत्ता चक्क चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. होय हे खरे आहे चित्रपट निर्माते सनोज मिश्रा यांनी त्यांच्या आगामी ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
तिच्या कुटुंबाने हा चित्रपट करण्याची परवानगी दिली आहे. या चित्रपटात मोनालिसा एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल ते जून या कालावधीत ईशान्य भारतात वेगवेगळ्या ठिकाणी होईल. हा चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होईल. असे ही ते म्हणाले.
डायरेक्टर सनोज मिश्रा कसा भेटला मोनालिसाला? एका खाजगी वृत्तवाहिनीवरील मोनालिसाची मुलाखत पाहिल्यानंतर, डायरेक्टर सनोज मिश्रा तिच्या शोधात प्रयागराज येथील महाकुंभात आला आहे . येथे तो तिच्या कुटुंबातील सदस्यांना भेटला.
कुटुंबातील सदस्यांनी सनोज मिश्रा आणि मोनालिसा आणि तिच्या वडिलांमध्ये त्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क केला. चित्रपटाच्या ऑफरवर बद्दल मोनालिसा खूप खूप खूश आहे. सनोज मिश्रा यांच्या मते, मोनालिसा आणि तिचे कुटुंब चित्रपटात काम करण्याची ऑफर ऐकून खूप आनंदी आणि उत्साहित आहेत.
त्यांच्या मते, या चित्रपटात काम मिळाल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबाची गरिबी संपेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मोनालिसाची आजी म्हणते की तिच्या नातीची खूप दिवसांपासूनची इच्छा चित्रपटांमध्ये काम मिळाल्याने पूर्ण होईल.शूटिंगपूर्वी मोनालिसाला मुंबईत तीन महिने अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाईल.