चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता भारतीय संघ जाहीर..! मोहम्मद शमीचं पुनरागमन
वनडे मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचेही स्पष्ट

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघामध्ये १५ सदस्य असणार आहेत १९ फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी ला सुरुवात होणार आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ इंग्लंड विरुद्ध च्या पहिल्या वनडे मालिकेत खेळणार आहे या संघाचा उपकर्णधार पदी युवा खेळाडू शुबमम गिलची वर्णी लागली आहे. तसेच इंग्लंड विरुद्ध च्या वनडे मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचेही स्पष्ट झालं आहे. त्या जागी हर्षित राणा खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये २०२४ च्या विश्वचषक नंतर पासून दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला मोहम्मद शमी खूप दिवसांनी होणारा विमान करत आहे तसेच या मालिकेत यशस्वी जयस्वाल ला पहिल्यांदाच एक दिवसीय संघात स्थान मिळाला आहे. चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबई मध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध २० फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळला जाणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफी २०२५ करिता भारतीय खेळाडूंची यादी
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधले भारतीय संघांचे सामने –
१) २० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२) २३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
३) २ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
४) ४ मार्च: उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
५) ९ मार्च: अंतिम (पात्र असल्यास), दुबई